Dombivli : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Dombivli : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

डोंबिवली - टॅंकरच्या धडकेत म्हारळ येथील एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी घडली आहे. कविता म्हात्रे असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत. कविता या दुचाकीवरुन प्रवास करीत असताना शहाड पुलावर त्यांच्या दुचाकीला टॅंकरची धडक बसली. यावेळी त्या टॅंकरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

म्हारळ परिसरात राहणाऱ्या कविता या कल्याण पूर्वेतील टाटा नाका येथील एका पेट्रोल पंपावर कामास होत्या. रविवारी दुपारी कामावर जाण्यासाठी त्या दुचाकी घेऊन निघाल्या. शहाड पूलावरुन त्या जात असताना पाठीमागून आलेल्या टॅंकरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरुन त्या खाली पडताच टॅंकरच्या मागच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. कविता यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा अपघात सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून त्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dombivli Women Accident Road Tanker Shock

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentwomendombivali