esakal | परप्रांतीयांकडून तिकीट शुल्क आकारु नका! मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

 परप्रांतीयांकडून तिकीट शुल्क आकारु नका! मुख्यमंत्र्याची केंद्राला विनंती

घरी जाणाऱ्या कामगारांकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर अडकलेल्या या स्थलांतरीत कामगारांना घरी जाण्याची संधी आहे; मात्र हे सर्व कामगार गरीब आहेत. त्यांच्याकडे तिकीटासाठी पैसे नाहित, त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क घेऊ, नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

परप्रांतीयांकडून तिकीट शुल्क आकारु नका! मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घरी जाणाऱ्या कामगारांकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर अडकलेल्या या स्थलांतरीत कामगारांना घरी जाण्याची संधी आहे; मात्र हे सर्व कामगार गरीब आहेत. त्यांच्याकडे तिकीटासाठी पैसे नाहित, त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क घेऊ, नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? राज्यात मद्यविक्रीस परवानगी; मात्र, "हे" नियम असतील बंधनकारक... 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रीया सुरु आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने गेल्या 40 दिवसांपासून जेवणाची, निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार तज्ज्ञ डॉक्‍टर...

सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था सुरूच राहिल, असही मुख्यमंत्री म्हणाले 
हातावर पोट असणारे हे कामगार आहेत. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था व संघटनांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून, या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले; तर या काळात त्यांना आधार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.