राज्यात मद्यविक्रीस परवानगी; मात्र, "हे" नियम असतील बंधनकारक!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

अखेर राज्य सरकारने सीलबंद मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. शहरी भागात कंटेनमेंट झोन वगळून सर्व स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करता येतील. मात्र, या सर्वांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, बंधनकारक आहे. 

 

मुंबई : अखेर राज्य सरकारने सीलबंद मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. शहरी भागात कंटेनमेंट झोन वगळून सर्व स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करता येतील. महापालिका व नगरपरिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्रीची दुकाने चालु करता येणार नाहीत. तसेच, मुंबई महानगरातील सर्व महानगरपालीका क्षेत्र, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरापालिका क्षेत्रातील स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने, निवासी संकुलामध्ये अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी फक्त पाच दुकाने चालु करण्यात अनुमती दिली आहे. दरम्यान या सर्वांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, बंधनकारक आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार तज्ज्ञ डॉक्‍टर...

मद्य उत्पादनासाठी नियम 

 • ग्रामीण भागातील सर्व मद्य निर्मिती सुरू होतील. 
 • मुंबई, मालेगाव, पुणे , पिंपरी चिंचवड वगळून इतर शहरांत कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवून मद्यनिर्मिती करता येईल. 
 • सर्व मद्य निर्मिती कारखान्यातील कामगारांची थर्मल स्क्रिनींग करावी. 
 • कामगारांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे लक्षणे दिसल्यास मद्य निर्मिती कंपनीत प्रवेश देऊ नये 
 • मद्य निर्मितीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे 

  ही बातमी वाचली का? प्रवासासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र हवंय? ...या ठिकाणी मिळणार

होलसेल मद्य विक्रीसाठी नियम 

 • ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार सुरू करण्यात येईल 
 • शहरी भागात कंटन्मेंट झोन वगळून इतर भागांत घाऊक मद्य विक्रिस सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी. 
 • घाऊक विक्रेत्यांवर कोरोनासंदर्भातील सुरक्षेचे नियम लागू राहतील 
 • दुकानदारांनी कामगारांची थर्मल स्क्रिनिंग करावी 
 • कामगारास सर्दी, खोकला, ताप यासांरखे लक्षणे आढळ्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये 
 • घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डिस्टन्सिंग पाळावे 

  ही बातमी वाचली का? सलून्स, ब्यूटी पार्लरबद्दल महत्त्वाचा निर्णय...
   

विदेशी शॉप, बियर शॉपी, देशी शॉप चे नियम 

 • सिल बंद मद्य विक्री करण्यास परवानगी 
 • ग्रामीण भागात मद्याचे दुकाने सुरू करता येतील. 
 • शहरी भागात मॉल्स, बाजार संकुलातील व बाजारातील मद्य विक्री दुकानांस परवानगी नाही. 
 • शहरात कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी मद्य विक्रीस परवानगी. 
 • सिल बंद मद्यविक्री करणाऱ्या दुकांनांसमोर एकावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक असू नये 
 • दुकानांसमोर प्रत्येक सहा फुटांवर वर्तुळ आखून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 
 • दुकानदाराने सर्व कामगारांची थर्मल स्क्रिनींग करावी. ज्या कामगारास सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षण आहे त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये. 
 • दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासाने निर्जंतुकीकरण करणे. 
 • दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात असावे. 
 • मद्य विक्री सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहिल. 
 • मद्याच्या वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही, वाहतूक सुरळीत होईल याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील 
 • दुकानदारास आवश्‍यकता असल्यास जिल्हा प्रशासन पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देईल 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांना मोठा दिलासा; कोरोना मृत्यू दर 9 वरून 3.5 टक्‍क्‍यांवर 

दुकानांसमोर असे सुचना फलक बंधनकारक 

 • दुकानाच्या कामकाजाच्या सुधारीत वेळा 
 • एका वेळी दुकानासमोर पाच पेक्षा अधिक व्यक्ती असु नये 
 • सोशल डिस्टिंन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य. 
 • दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही 
 • परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे. 
 • दुकानाकडून, ग्राहकांकडून नियम भंग झाल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to sell alcohol in the state, Mumbai, Malegaon, Pune excluding containment zones