'वाढीव वीजबिल भरू नका'; राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

'वाढीव वीजबिल भरू नका'; राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

मुंबई - वाढीव वीजबिलाविरोधात राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सह राज्यातील विविध ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलन केले आहे.दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील नागरिक कोरोना काळात आर्थिक तंगीत असताना वाढीव वीजबिलांमुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे. राज्य सरकारने आधी या बिलांमध्ये सवलत देण्यात येईल असे म्हटले होते. परंतु त्यानंतर महावितरणाने सवलत नाकारल्या नंतर नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत मनसेने जोरदार आंदोलन पुकारले आहे, मुंबई, ठाणे, पुणे सह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाच्यामाध्यमातून नागरिकांना वीजबिल न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज तोडणी करण्यास कोणी आले तर त्यांचा संघर्ष मनसैनिकांशी होईल असेही आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. 

मनसेच्या आंदोलनात राज ठाकरे स्वतः उतरू शकतात अशी शक्यता मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. परंतु थेट आंदोलनात न उतरता, राज ठाकरे यांनी जनतेला वाढीव वीजबिल न भरण्याचे आवाहन केले आहे. असे मनसे नेत्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com