esakal | TRP मागे पळू नका, जबाबदारीने बातम्या द्या - मुंबई उच्च न्यायालय

बोलून बातमी शोधा

मुंबई उच्च न्यायालय

TRP मागे पळू नका, जबाबदारीने बातम्या द्या - मुंबई हायकोर्ट

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढतोय. रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन बेड्स, वेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सध्या अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनबद्दल न्यायालयाने विचारणा केली. रेमडेसिव्हरचं वाटप कसं होतं? असा प्रश्न कोर्टाने विचारला.

त्यावर जिल्हयातील रुग्णसंख्येनुसार रेमडेसिव्हीरच वाटपं केलं जात असल्याचं सांगण्यात आलं. खासगी हॉस्पिटल्स एफडीएमार्फत ही इंजेक्शन विकत घेतात, तर मुंबई महापालिका स्वत:च्या रुग्णालयांमध्ये या इंजेक्शन्सचा पुरवठा करत असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

हेही वाचा: नाशिकमध्ये घडला तो अपघात पण मुंबईत... - किशोरी पेडणेकर?

"सध्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे. औषध, ऑक्सिजन मिळत नाहीय. तर त्याबद्दल औषध, ऑक्सिजन कुठे उपलब्ध आहे, याबद्दल आपण वेबसाइटवरुन माहिती देऊ शकतो का? हेल्पलाइन सुरु करावी" असे न्यायालयाने म्हटले आहे. "मीडियालाही सनसनाटी बातम्यांच्या नादी लागू नका. टीआरपीच्या मागे पळू नका, भान ठेवा, जबाबदारीने बातम्या द्या" असे न्यायालयाने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमुर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.

(संपादन - दीनानाथ परब)