esakal | नाशिकमध्ये घडला तो अपघात पण मुंबईत... - किशोरी पेडणेकर

बोलून बातमी शोधा

किशोरी पेडणेकर
नाशिकमध्ये घडला तो अपघात पण मुंबईत... - किशोरी पेडणेकर?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: नाशिक ऑक्सिजन प्लान्टमधल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने कोविड सेंटरचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपणही मुंबईतल्या कोविंड सेंटर, ऑक्सिजन प्लान्टचं ऑडिट करणार का? असा प्रश्न महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी "सगळ्यांपेक्षा मुंबईतील प्लान्ट अद्ययावत आहे, असं म्हणायला हरकत नाही. कोविड सेंटरची सुरक्षा लक्षात घेऊन, काळजी घेतली जात आहे" असे महापौर म्हणाल्या.

"मुंबईत लिक्विड ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी कोणालाही आत सोडलं जाणार नाही. तसे आदेश दिलेत. प्लान्टपासून १० मीटर लांब अंतरावर जाळया बसवल्या जातील. ऑक्सिजन प्लान्टचे जे जॉईंटस आहेत, ते सतत चेक करतोय" असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. "ऑडिट आणि सुरक्षा एकत्र चालू आहे.

हेही वाचा: 'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी

"नाशिकमधल्या घटनेनंतर आपण अधिक सतर्क आहोत. अधिक लक्ष देणं महत्त्वाचं आहे. नाशिकमधल्या ऑक्सिजन प्लान्टमध्ये घडला तो अपघात होता, दुसरा घडवला जाऊ शकतो. कुठलाही धोका पत्करायचा नाही. सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकल्पाजवळ गस्त घातली पाहिजे" असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.