जबाबदारीने वागा, गोंधळ वाढवणारे मेसेजेस फॉर्वर्ड करू नका; अदानीच्या ग्राहकांना सूचना

कृष्ण जोशी
Tuesday, 27 October 2020

अनेकदा काही मर्यादित ठिकाणचा वीजपुरवठा अमक्या दिवशी अमुक वेळात खंडित होणार असल्याच्या सूचना अदानीतर्फे ग्राहकांना पाठविल्या जातात.

मुंबई : एखाद्या उपनगरात वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणार असल्याचा अधिकृत संदेश उत्साही वीजग्राहक शहरभर आपल्या मित्रांना पाठवून देतात. त्यामुळे नंतर उडणारा प्रचंड गोंधळ टाळण्यासाठी ग्राहकांनी जबाबदारीने वागावे, असे सांगण्याची वेळ अदानी  इलेक्ट्रिसिटीवर आली आहे. 

अनेकदा काही मर्यादित ठिकाणचा वीजपुरवठा अमक्या दिवशी अमुक वेळात खंडित होणार असल्याच्या सूचना अदानीतर्फे ग्राहकांना पाठविल्या जातात. मात्र वीजग्राहक त्या सूचना इतर विभागांमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्रांना पाठवतात, त्या इतर ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणार नसतो. यातून उडणाऱ्या गोंधळामुळे अदाणीच्या ग्राहकसंपर्क विभागात हजारो लोकांचे दूरध्वनी येऊन बिकट प्रसंग उद्भवतो. त्यामुळे वीजग्राहकांनी असे संदेश ज्या विभागासाठी असतील त्या विभागाबाहेर पाठवू नयेत, असे आवाहन अदानीने केले आहे. 

महत्त्वाची बातमी : टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु

या गोंधळात अदाणीच्या कॉलसेंटरला अनावश्यक दूरध्वनी येतात, तसेच ग्राहकही कार्यालयांमध्ये येऊन विचारणा करतात. त्यामुळे ग्राहकांच्या तातडीच्या समस्या सोडविण्यात अडचणी येतात. वीज नेटवर्कची देखभाल करण्यासाठी नियोजनबद्ध रितीने काही काळ वीजपुरवठा बंद केला जातो. त्याबाबत ग्राहक सज्ज असावेत म्हणून त्यांना पूर्वसूचनाही दिली जाते. मात्र ग्राहकांनी अशा नोटिसा अन्य भागात पाठवू नये व जबाबदारीने वागावे, असे आवाहन अदाणी ने केले आहे. अधिक माहितीसाठी www.adanielectricity.com

dont send misleading messages adani electricity urges to customers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont send misleading messages adani electricity urges to customers