दुर्बल घटक योजनेची शिष्यवृत्ती दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ६ हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करून ती आता १२ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना २००८ पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी ६ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून ४ वेळा देण्यात येत होती. आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. 

Web Title: double scholarships in maharashtra