शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या खर्चात दुपटीने वाढ; सल्लागार नेमणूक निविदांना पुन्हा मुदतवाढ

तेजस वाघमारे
Saturday, 14 November 2020

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.

मुंबई : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आठ वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च 517 कोटी होता. तो आता 1 हजार 51 कोटींवर पोहचला आहे. 

हेही वाचा - रस्त्याच्या वादातून सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; मानपाडा पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल

मुंबई पारबंदर प्रकल्पाबरोबरच शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम मार्गी लावण्याचा एमएमआरडीए प्रशासनाचा प्रयत्न होता. यामधील मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे; मात्र अद्यापपर्यंत शिवडी-वरळी मार्गाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे मुंबई पारबंदर मार्ग खुला झाल्यास दक्षिण मुंबईत आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एमएमआरडीएने उन्नत मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने उन्नत मार्गाचे संकल्पचित्र आणि बांधकाम करण्याच्या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. 

हेही वाचा - हजारो प्राचीन दिव्यांचा अद्वितीय संग्रह! मकरंद करंदीकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून गौरव

असा आहे प्रकल्प आराखडा 
शिवडी-वरळी उन्नत मार्ग साडेचार किलोमीटर लांब; तर 17.20 मीटर रुंद असणार आहे. आठ वर्षांपूर्वीच्या प्रकल्प अहवालानुसार बांधकामाची अंदाजित किंमत 517 कोटी होती. गेली आठ वर्षे हा प्रकल्प रखडल्याने याचा बांधकाम खर्च आता 1051 कोटींवर पोहचला आहे. हा प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे; परंतु प्रकल्पाचे काम रखडल्यास प्रकल्पाची किंमत पुन्हा वाढणार आहे. 

Doubling of cost of Shivdi Worli elevated road Consultant Appointment Tenders Re-Extended 
----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubling of cost of Shivdi Worli elevated road Consultant Appointment Tenders Re-Extended