
रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 28 दिवसांवर तर रूग्ण वाढीचा दर सरासरी 2.49 %
मुंबई : मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जरी 60 हजाराच्या वर गेला असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून तो 28 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर हा 2.49 वर आला असून मे मध्ये तो 6.61 इतका होता. त्यामुळे मुंबईतील रुग्णवाढ ही नियंत्रणात येत असल्याचे दिसते.
देशातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. येथे रुग्णवाढीचा विस्फोट होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र मुंबईतील रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात यश आल्याचे दिसते. एप्रिलच्या अखेरीस रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी हा 7 दिवस होता तर मे अखेरीस तो 16 दिवसांवर आणण्यात यश आले. आता तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून तो थेट 28 दिवसांवर नेण्यात यश आले आहे.
मोठी बातमी - प्रेरणादायी! मुंबईत 100 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
पालिकेच्या 24 विभागणांपैकी 6 विभाग असे आहेत जेथे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांपेक्षा अधिक आहे. या विभागातील रूग्णवाढ ही सरासरी 2% पेक्षा कमी आहे. त्यापैकी एच पूर्व 49 दिवस ( 1.4%), जी उत्तर 48 दिवस ( 1.5%), एल आणि ई 46 दिवस ( 1.5%),एफ उत्तर मध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 55 दिवसांवर पोहोचला असून रूग्ण वाढीचे प्रमाण 1.3% असे सर्वात कमी आहे. एम पूर्व मध्ये रूग्ण दुप्पट व्हायला 53 दिवस लागलेले असून तेथीलही रूग्ण वाढीचा सरासरी दर एफ उत्तर प्रमाणे 1.3% असाच आहे. याशिवाय ए आणि बी विभागातही रूग्णवाढीचा सरासरी दर 2% पेक्षा कमी असून तो अनुक्रमे 1.9 % आणि 1.8 % असा आहे.
मोठी बातमी सुशांत सिंह आत्महत्या: भाजपनं राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी
पालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये कोविड 19 रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी समवेत रूग्णवाढीच्या सरासरी दारावर देखील लक्ष ठेवले जात आहे. रुग्णवाढीच्या सरासरी दरामुळे, एखाद्या अशा विशिष्ट विभागामध्ये की जिथे रुग्णसंख्या कमी आहे, त्याठीकाणी रुग्णांची वाढ होऊ लागल्यास त्याची तातडीन दखल घेण्यास मदत होते. या निकषांनुसार रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त अथवा कमी अश्या गटांमध्ये विभागांचे वर्गीकरण केले जात होते. विशिष्ट विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास, तेथे प्रतिबंधित क्षेत्राचे कठोरपणे पालन करणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी नागरी समदायाकडुन अधिकाधिक सहभाग मिळवणे, यासाठी कार्यवाही केली जात होती. आता पालिकेच्या 21 विभागातील रुग्णवाढीचा सरासरी दर हा 4 टक्क्यांच्या आत आला असून केवळ तीन विभागात तो 4 टक्क्यांच्या वर आहे.
doubling rate of covid 19 in mumbai gone to 28 days good news for mumbaikar