
उल्हसनगर : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सुभाष टेकडी मधील चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. बौद्ध समाजाचे धर्मगुरू भन्ते आनंद महाथेरो यांच्या हस्ते आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला आहे.तेंव्हा सुभाष टेकडीचा चौक रोषणाईने उजळून निघाला होता.