'राजगृह' तोडफोड प्रकरणः राष्ट्रवादीकडून निषेध, आक्रमक पवित्रा घेत केली 'ही' मागणी

'राजगृह' तोडफोड प्रकरणः राष्ट्रवादीकडून निषेध, आक्रमक पवित्रा घेत केली 'ही' मागणी

मुंबईः  मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर मंगळवारी रात्री दोन अज्ञातांनी हल्ला केला. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली आहे. कुंड्यांचं सुद्धा मोठं नुकसान करण्यात आलं. बाबासाहेबांच्या निवासस्थानी झालेल्या तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ट्विट करुन दोन्ही मंत्र्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आरोपींवर कठोर कारवाई करावी असं म्हटलं आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी ! जय भीम !, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.  आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. 

दोन्ही मंत्र्यांच्या ट्विटला गृहमंत्र्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गृहमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. 

बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.  आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

dr babasaheb ambedkars mumbai residence attack ncp leader dhananjay munde jitendra awhad angry tweet home minister anil deshmukh

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com