डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृहा'वर अज्ञातांकडून तोडफोड...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

मुंबईच्या दादर परिसरात असलेले 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी खास ग्रंथालय आणि अभ्यासासाठी हे घर बांधले होते.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. दोन व्यक्तींनी राजगृहाच्या आवारात घुसून सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक केली. दरम्यान, राजगृहाच्या आवारातील कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

मुंबईच्या दादर परिसरात असलेले 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी खास ग्रंथालय आणि अभ्यासासाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

बॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...

आज सायंकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी राजगृह येथे येऊन तोडफोड करण्याचा प्रकार केला. त्यांनी घराबाहेरील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. या प्रकाराबात माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर घटनेबाबत तपास सुरु केला असून आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना सुपूर्द केले आहे. पोलिस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown person vandalized cctv and plants at dr. babasaheb ambedkar resident at mumbai rahgruh