
विरार (बातमीदार) : वसई मध्ये राहणारे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिने-पार्श्वगायक डॉ. गणेश चंदनशिवे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'सर्वोत्कृष्ट लोककलावंत' पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची ही एक मोठी पावती मानली जात आहे.