esakal | राजकुमार हिरानीचा मुलगा असल्याची बतावणी, इंन्स्टाग्रामवरुन फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkumar Hirani

राजकुमार हिरानीचा मुलगा असल्याची बतावणी, इंन्स्टाग्रामवरुन फसवणूक

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) त्याच्या चित्रपटासाठी नवोदित अभिनेत्याच्या शोधात असल्याची इन्स्टाग्रामवर (Instagram) जाहिरात देऊन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी (Andheri Police) गुन्हा दाखल (FIR) केला आहे. आरोपीने स्वतःला हिरानी यांचा मुलगा (Hiranis son) सांगून फसवणूक झालेल्या तरुणाचा विश्वास संपादन केला होता. पोलिस आता आरोपीच्या शोधात आहेत. ( Someone Showing As Rajkumar hiranis son on instagram fraud case police investigating)

अंधेरी पूर्व येथे आर.एच फिल्मचे कार्यालय आहे. त्यांच्यावतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आर.एच फिल्मच्या अधिका-यांना 2 जुलैला या फसवणूकीबाबतची माहिती मिळाली होती. फसवणूक झालेल्या तरूणाने स्वतः कंपनीच्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवून या फसवणूकीबद्दलची माहिती दिली होती. आरोपीने कबीर हिरानी नावाने इन्स्टाग्राम प्रोफाईल तयार केले होते. त्या मार्फत करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये 3 टिनेजर या चित्रपटासाठी नवा चेहरा हवा, असल्याचे नमुद करण्यात आले होते. या भूमिकेसाठी त्यांनी 20 कोटी रुपयांचे आमिष या तरुणाला दिले होते.

हेही वाचा: मुंबई महापालिकेतील भाईगिरी संपणार ?

त्यानंतर 6 जूलैला आणखी एका तरूणाचा हिरानी यांच्या कार्यालयात ई-मेल आला. आरोपीने त्यालाही अशाच प्रकारे दावा केल्याचे नमुद केले होते. या तरुणालाही आरोपीने आपण हिरानी यांचा मुलगा असल्याचे सांगितले, तसेच आरोपीने प्रोफालमध्ये हिरानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम प्रोफाईलला टॅग केले होते. त्याप्रमाणे विश्वास संपादन करण्यासाठी हिरानी यांच्या अंधेरीतील कार्यालयाच्या पत्ताही दिला होता. या दुस-या ई-मेलनंतर हिरानी यांच्या कंपनीने याप्रकरणी तक्रार केली. आरोपीने अशा प्रकारे इतर तरुणांनाही फसवल्याचा संशय असून त्याचा शोध सुरू आहे.

loading image