मनोहर जोशी यांचं 'ते' वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका नव्हे - डॉ नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मनोहर जोशी यांनी केलेलं विधान हे पूर्णपणे वैयक्तिक असुन ही शिवसेनेची भुमिका नाही -  डॉ.  नीलम गोऱ्हे

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार येऊन 13 दिवस झाल्यानंतरही मनोहर जोशी हे अजूनही शिवसेना भाजप युतीचा आग्रह सोडत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महत्त्वाची बातमी "कोण म्हणालं आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही?" शिवसेनेच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
 

लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेच्या झालेल्या कोंडीविषयी मनोहर जोशी यांना विचारल्यावर त्यांनी मत व्यक्‍त केले. ते म्हणाले, की शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर ते योग्य झाले असते. मात्र सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना ही युती नको आहे, अशी खंत मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. शिवसेनेने भाजपसोबत राहायला हवे, असे माझे मत असले तरी त्याबाबत निर्णय पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

मनोहर जोशी यांचं विधान भावनिक

यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी, मनोहर जोशी यांचं विधान भावनिक असल्याचं म्हटलंय. मनोहर जोशी यांनी केलेलं विधान हे पूर्णपणे वैयक्तिक असुन ही  शिवसेनेची  भुमिका नाही, असं मत नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. 

महत्त्वाची बातमी : देवेद्र फडणविसांचा 'ठाकरे सरकार'वर हल्लाबोल, म्हणालेत..

ज्येष्ठ पिढीच्या या भावना त्यांच्या मनात राहणे स्वाभाविक असले तरी सध्याचे भाजपचा मार्ग आणि व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही. म्हणूनच मनोहर जोशींचे हे मत म्हणजे शिवसेनेची भुमिका नाही असे मत शिवसेना प्रवक्ता नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले आहे.

WebTitle : dr neelam gohre on the statement of senior BJP leader manohar joshi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr neelam gohre on the statement of senior BJP leader manohar joshi