esakal | Corona: लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद, चार कोटींचा टप्पा गाठला!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

Corona: लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद, चार कोटींचा टप्पा गाठला!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात (Corona Vaccination) महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा (Corona dose) टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सांगितले. ( Dr Pradeep Vyas gives information About corona Vaccination-nss91)

हेही वाचा: शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा

देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 93 लाख 25 हजार 362 एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

loading image