मुंबई : न्यायालयीन कोठडी असतानाही पोलीस ठाण्यातच पाहुणचार? | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 doctor arrested
मुंबई : न्यायालयीन कोठडी असतानाही पोलीस ठाण्यातच पाहुणचार?

मुंबई : न्यायालयीन कोठडी असतानाही पोलीस ठाण्यातच पाहुणचार?

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विनयभंगाचा आरोप (Molestation case) असलेला कांदिवली चारकोपमधील आरोपी डॉ. सुधीर शेट्टी (Accused dr sudhir shetty) याच्यावर अजूनही पोलीस मेहेरबानच असल्याचे समोर आले आहे. ‘सकाळ’ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेट्टीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) पाठवण्यात आले होते; परंतु सध्या त्याचा पोलीस ठाण्यातच पाहुणचार केला जात असल्याचे समजते. त्यामुळे न्यायालयाचा आदेश असतानाही पोलीस आरोपीला मदत का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. (dr sudhir shetty arrested in molestation case but police may gives facilities even after judicial custody)

हेही वाचा: मुंबई : अखेर बीडीडी चाळीवर पडणार हातोडा

२७ डिसेंबरला दोन महिन्यांनंतर डॉ. सुधीर शेट्टीवर मुंबईच्या चारकोप पोलिसांनी विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुराव्यांची शहानिशा करण्याच्या नावाने तीन दिवस वेळ घेतल्यानंतर ३० डिसेंबरला त्याला अटक केली. त्यानंतर ३१ तारखेला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या पुढच्या तपासासाठी पोलिस कोठडीचीही मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने डॉ. शेट्टीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.

१ जानेवारीला तो जामिनासाठी अर्ज करणार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात न करता ठाण्यातच त्याचा पाहुणचार होत असल्याचा आरोप होत आहे. १ जानेवारीला पोलिस ठाण्यातूनच पोलिस त्याला न्यायालयात घेऊन आले. १ जानेवारीला आपल्याला जामीन मिळेल, असा विश्वास सुधीर शेट्टी आणि चारकोप पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यातच ठेवले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

पोलिसांशी संपर्क नाही

झाल्या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी चारकोप पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top