Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; तब्बल 'एवढ्या' कोटींचे ड्रग्ज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dri action at mumbai airport drugs

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; तब्बल 'एवढ्या' कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : मुंबई विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्जच्या मोठ्या कारवाईत डीआरआयने मुंबई विमानतळावर 15 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. परगावहून मुंबईत ड्रग्ज आणले जात होते. (dri action at mumbai airport drugs )

हेही वाचा: Bachchu Kadu: ...तर राणांच्या घरी भांडी घासेन; बच्चू कडू थेट पोलिसांत

मिळालेल्या माहितीनुसार, अॅम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात एनसीबी आणि इतर एजन्सी मुंबईतील ड्रग्ज अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीचे उपमहासंचालक, ज्ञानेश्वर सिंह म्हणाले होते की एजन्सीने आपली प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली आहे. अर्थात एजन्सी फक्त मोठ्या ड्रग्स तस्कर आणि माफिया टोळ्यांना पकडण्यासाठीच कारवाई करेल याकडे त्यांचे संकेत होते. यानुसार NCB ने भारतात कार्यरत असलेल्या परदेशी कार्टेलकडून 7 किलो कोकेन जप्त केले आहे.