esakal | बेकायदा विदेशी कार विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बेकायदा विदेशी कार विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : दुतावासातील अधिका-यांच्या (Embassy Officer) नावाने महागड्या परदेशी कार (Luxury Cars) नोंदवून खासगी व्यक्तींना विकणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (DRI) यश आले आहे. याप्रकरणी गाडी विक्री करणा-या कंपनीच्या अधिका-यांसह तिघांना अटक (Three Arrested) करण्यात आली आहे. या रॅकेटप्रकरणी सात शहरांमध्ये डीआरआयने ऑपरेशन मॉन्टे कार्लो राबवले. 20 हून अधिक गाड्या अशा पद्धतीने भारतात (India) आणून कोट्यावधींचा कर (Crore rupees Tax) बुडवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीत. यामागे दुबईतील मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (DRI Officers Arrested three people abroad luxury car import case using Embassy details-nss91)

दुतावासात काम करणा-या अधिकारी व त्याच्या कुटुंबियांना वस्तूंच्या आयातीवर विशेष कर सवलत मिळते. त्याचा फायदा आरोपी घेत होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतील असून यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग निष्पन्न झाला होता. आरोपी दुतावासात काम करणा-या अधिका-यांच्या नावाने महागड्या गाड्या युके, जपान व दुबई येथून मागवायचे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तपासणी केली असता या गाड्या सेकंड हँड महागड्या कार विकणा-या व्यक्तींना दिल्या जात होत्या. भारतात आल्यानंतर त्या गाड्या आरटीओ मध्ये नोंदवल्या जायच्या. त्यानंतर त्यांची विक्री केली जायचे. अशा प्रकारे सुमारे 204 टक्क्यांचा कर चुकवून सरकारचे मोठे नुकसान केले जात होते.

हेही वाचा: रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लाॅक, जाणून घ्या सविस्तर

आफ्रीका देशाच्या दिल्लीतील एका दुतावासातील एका अधिका-याच्या नावाने करण्यात आलेल्या गाडीच्या नोंदणीवर डीआरआयने विशेष लक्ष ठेवले होते. मुंबईत ती कार आल्यानंतर अंधेरीतील शोरुममध्ये ती कार डिस्प्लेसाठी ठेवण्यात आली. त्यासाठी देशभरात सात शहरांमध्ये ऑपरेशन मॉन्टेकार्लो राबवून सहा गाड्यांची माहिती घेण्यात आली. आणखी काही गाड्या डीआरआयच्या रडारवर आल्या आहेत. याप्रकरणी गुडगावमधील कार विक्री कंपनीच्या एका मुख्य कार्यकारी अधिका-यासह तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने 20 हून अधिक गाड्या भारतात आणण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत 25 कोटी रुपयांचा कर बुडवण्यात आला आहे.

loading image