esakal | रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लाॅक, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Mega block

रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लाॅक, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ट्रान्सहार्बर, हार्बर मार्गाची देखभाल व दुरुस्तीची (Railway Repairing Work) कामे करण्यासाठी रविवारी, (ता.18) रोजी मेगाब्लाॅक (Mega block) घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्सहार्बर मार्ग आणि हार्बर मार्गाच्या प्रवाशांना (Travelers) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) प्रवास करण्याची परवानगी आहे. तर, रविवारी, मुख्य मार्गिकेवर कोणताही ब्लाॅक नसल्याचे मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाकडून सांगण्यात आले. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा चालविल्या जातील. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक (Sunday Mega block) नसून रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येईल. ( Railway Mega block on Sunday for railway repairing work-nss91)

कुठे : ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी / नेरूळ / पनवेल अप व डाऊन

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान

परिणाम : ब्लाॅकदरम्यान ठाणे येथून वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणेसाठी सुटणाऱ्या अप सेवा ब्लाॅक कालावधी दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Eleventh Admission: राज्य शिक्षण मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

कुठे : हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी / वांद्रे डाऊन

कधी : सकाळी 11.40 ते सांयकाळी 4.40 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

कुठे : विरार ते वसई रोड दरम्यान अप जलद मार्गावर रात्रकालीन ब्लाॅक

कधी : शनिवारी-रविवारी रात्री 11 ते रात्री 3 वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लाॅक कालावधीमध्ये विरार ते वसई रोड दरम्यान अप जलद मार्गावर ब्लाॅक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.

loading image