आज मद्यपींची ब्रेथ ऍनालायझर टेस्ट होणार नाही तर थेट ब्लड टेस्ट होणार, दोषी आढळल्यास सहकार्यांवरही कारवाई

आज मद्यपींची ब्रेथ ऍनालायझर टेस्ट होणार नाही तर थेट ब्लड टेस्ट होणार, दोषी आढळल्यास सहकार्यांवरही कारवाई

मुंबई : नववर्षाच्या स्वागतवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शिवाय थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आज मुंबई पोलिसांची मोठी फौज मुंबईच्या रस्त्यांवर खडा पहारा देणार आहेत. अशात यंदा  जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल किंवा तसा तुमचा काही विचार असेल, तर यंदा तुमची ब्रेथ ऍनालायझर टेस्ट केली जाणार नाही, मात्र यंदा थेट तुमची ब्लड टेस्ट केली जाणार आहे. ब्लड टेस्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले तर तुमच्यावर अत्यंत कठोर कारवाई देखील होऊ शकते.

मुंबईसह संपूर्ण जगात दरवर्षी थर्टी फर्स्ट  मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पार्ट्या, धमाल, मस्ती या दिवशी मोठ्या प्रमाणात दिसून येते. शिवाय कायद्याची पायमल्ली करणारे आणि ड्रिंक अँड ड्राइव्ह करणारे देखील पकडले जातात. मात्र यंदा ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरण दिसून आलं तर थेट रुग्णालयात दाखल करून ब्लड टेस्ट केली जाणार असल्याचं ट्रॅफिक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय त्या गाडीत असलेल्या इतरांनाही याच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईचे जॉईंट सीपी यशस्वी यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

थर्टी फर्स्ट पार्टीनंतरही या गोष्टी ध्यानात ठेवा : 

  • थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिस सज्ज 
  • दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर असेल पोलिसांची करडी नजर ' 
  • यंदा ब्रेथ ऍनालायझरने तपासणी होणार नाही 
  • संशय आल्यावर केला जाणार ब्लड टेस्ट 
  • थेट रुग्नलयात होऊ शकते रवानगी 
  • रक्तात दारू आढळली तर होणार कठोर कारवाई  
  • चालकासोबत इतरांवर देखील होणार कारवाई 

यावर्षी दरवर्षीपेक्षा वेगळी परिस्थिती असल्यामुळे वेगळे फायदे पोलिसांनी राबवले आहेत. त्यांच्या नियमानुसारच थर्टी फर्स्टच्या उत्साह साजरा करावा लागणार आहे. रात्री 11 नंतर मुंबईत कलम 144 लागू असल्याने कोणीही गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांवर फिरताना पाच पेक्षा जास्त माणसं आंधळीं आल्यास मोठी कारवाई होऊ शकते असेही मुंबईचे जॉईंट सीपी यशस्वी यादव यांनी सांगितलं. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. यावर्षी  31 डिसेंबरच्या रात्री ड्रिंक अँड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रॅफिक विभागाकडून 94 टीम बनवण्यात आल्या आहेत. सोबतच 3000 ट्रॅफिक कर्मचारी यंदा 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर असतील. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, गर्दी जमू नये, कोरोनाचा प्रसार होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलिसच्या 35,000 पेक्षा जास्त पोलिस बल रस्त्यावर खडा पहारा देणार आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

drink and drive blood test will be done 35 thousand cops will be on the roads of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com