
New Year's Warning: सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी नववर्षाच्या सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. थर्टी फर्स्टची रात्र गाजवत मद्याचे ग्लास रिचवणाऱ्या तळीरामांनीही आतापासूनच आपल्या ‘स्टॉक’ची जुळवाजुळव सुरू केली आहे.
मद्यपान करण्यासाठी अनेक कारणे शोधली जातात. हॉटेल्स, रिसॉर्ट व खासगी पार्ट्या रंगणार आहेत. या वेळी मारामारी, वादावादी होऊ नये, तसेच मद्यप्राशन करून वाहने चालवू नये, म्हणून पोलिसांनी सूचना केल्या आहेत. मद्यप्राशन करून कोणी वाहन चालवताना आढळले, तर त्यांची खैर नाही. थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यामुळे सरते वर्ष आणि नववर्षाचे स्वागत तुरुंगामध्येच होईल, असा इशारा पोलिसांनी मद्यपींना दिला आहे.