मंत्रालयातील लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी, ड्रेसकोडनंतर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सुमित बागुल
Wednesday, 6 January 2021

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात.

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने ड्रेसकोडचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला होता. यानंतर आता आणखीन एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता मंत्रालयातील लॉबीत किंवा जिन्यामध्ये उभं राहून चहा किंवा कॉफी पिण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. 

महत्त्वाची बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा जीव धोक्यात, कोण उठलंय मुंबई महापौरांच्या जीवावर ?

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात. अशात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी असल्यास त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर देखील होतो. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. 

महत्त्वाची बातमी :  आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?

महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक मंत्रालयात आपल्या विविध कामांसाठी येत असतात. अशात मंत्रालयात कोणत्याही वेळी कर्मचारी किंवा अधिकारी लॉबीत, कॉरिडॉर किंवा जिन्यावर चहा कॉफी पिताना आढळून येतात. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी मंत्रालयाच्या कॉरिडॉर किंवा लॉबीत चहा न पिण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

drinking tea or coffee in mantralaya corridor in snot allowed decision by government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drinking tea or coffee in mantralaya corridor in not allowed decision by government