Mumbai News : १५० रेल्वे स्थानकांवर लवकरच ड्रोनची गस्त! लोकलच्या सुरक्षेला १४ हायटेक उपकरनाचे कवच

मुंबई लोकलमधील वाढती प्रवासी गर्दी आणि सुरक्षेची आव्हाने लक्षात घेऊन स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
drone watch on railway

drone watch on railway

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - मुंबई लोकलमधील वाढती प्रवासी गर्दी आणि सुरक्षेची आव्हाने लक्षात घेऊन स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे गस्त, संशयास्पद वस्तूंच्या तपासणीसाठी बॉम्ब शोधक यंत्रे, तर प्रवेशद्वारांवर बॅगेज स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर बसविण्याची मागणी लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा ऑडिटच्या माध्यमातून केली आहे.

Loading content, please wait...