

Ganesh Nagar Meghwadi
ESakal
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत गणेश नगर-मेघवाडी येथील सेक्टर-६ मध्ये करण्यात आलेली निष्कासन आणि पाडकामाची कारवाई कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्याचा आरोप धारावी पुनर्विकास प्रकल्पाने फेटाळून लावला आहे. संबंधित रहिवाशांना अनेक टप्प्यांत सूचना देण्यात आल्या, आक्षेप नोंदविणाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली आणि त्यानंतरच निष्कासनाची कारवाई करण्यात आल्याचे DRPने स्पष्ट केले आहे.