सफरचंदाच्या कंटेनरमधून ड्रग्सची तस्करी; 500 कोटींचे कोकेन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cocaine seized

ड्रग्ज विरोधात एका मोठ्या कारवाईत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 50.23 किलो कोकेन अमली पदार्थ जप्त केले आहे.

सफरचंदाच्या कंटेनरमधून ड्रग्सची तस्करी; 500 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई - ड्रग्ज विरोधात एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या म्हणजेच डीआरआय झोन युनिटने आंतरराष्ट्रीय बाजारात 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 50.23 किलो कोकेन अमली पदार्थ जप्त केले आहे. डीआरआयनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआय अधिकाऱ्याना गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने कारवाई केली.

6 ऑक्टोबर रोजी, न्हावा शेवा बंदरावर डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेल्या हिरवी सफरचंद असलेला कंटेनर रोखला. मालाची तपासणी केल्यावर, हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे 1 किलो वजनाच्या मोठ्या विटा लपविल्या गेल्याचे उघड झाले. या कारवाईदरम्यान 50.23 किलो वजनाच्या आणि 502 कोटी रुपयांच्या एकूण 50 विटा जप्त करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार कोकेन असलेला सफरचंदाचा कंटेनर वाशी येथील एका व्यापाऱ्याच्या नावाने दक्षिण आफ्रिकेतून आयात केला जात होता. याच व्यापाऱ्याला या महिन्याच्या सुरुवातीला डीआरआयने 198 किलो एमडी आणि 9 किलो कोकेन तस्करी प्रकरणी अटक केली होती.

टॅग्स :crimeMumbaiappleDrug