अकराशे रुपये आणि पाच वर्ष तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

चाकू काढून धमकावून माजवली दहशत

ठाणे : अकराशे रुपयांच्या चोरीप्रकरणी एका तरुणाला पाच वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. वाईन शॉपमध्ये मद्य खरेदीसाठी गेलेल्या या तरुणाने एका ग्राहकाचे अकराशे रुपये चाकूचा धाक दाखवून लुटले होते.

याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. पंधारीकर यांनी तरुणाला दोषी ठरवून पाच वर्ष तुरुंगवास आणि सहा हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा प्रकार जुलै 2016 रोजी कॅसलमिल नाक्‍यावरील मद्याच्या दुकानात घडला होता. सरकारी वकील म्हणून ऍड. रेखा हिरवाळे यांनी नऊ साक्षीदार तपासले. 

मोठी बातमी :  उद्या होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट

राबोडी येथे राहणारा आरोपी सलीम ऊर्फ अल्ताफ सय्यद ऊर्फ अप्पू काल्या (वय 35) हा 22 जुलै 2016 रोजी कॅसलमिल येथील जयशंकर वाईन शॉपमध्ये मद्याची बाटली खरेदी करण्यासाठी गेला होता. मद्याची बाटली घेतल्यानंतर वाईन शॉपचे मॅनेजर तक्रारदार राजेश शेट्टी यांनी पैशांची मागणी केली. याचा राग आल्याने आरोपी सलीम याने मला पैसे मागतो काय? असे म्हणत अरेरावी केली.

मोठी बातमी : आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या औषधांच्या रंगाचा अर्थ माहितीये का ?

दरम्यान, वाईन शॉपमध्ये आलेल्या दुसऱ्या ग्राहकाने काऊंटरवर ठेवलेले अकराशे रुपये घेऊन हे पैसे आपलेच असल्याचे सांगत जवळील चाकू काढून धमकावून दहशत माजवली. हा प्रकार पाहून दुकानात आलेल्या अन्य ग्राहकांनी धूम ठोकली; तर आसपासच्या दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करून पळ काढला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष आणि पोलिसांचा तपास ग्राह्य धरीत  न्यायाधीश पंधारीकर यांनी सलीम काल्या याला पाच वर्ष तुरुंगवास आणि सहा हजार 200 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.  

WebTitle : drunk man goes in jail for not giving eleven hundred rupees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunk man goes in jail for not giving eleven hundred rupees