आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या औषधांच्या रंगाचा अर्थ माहितीये का ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

  • म्हणून हॉस्पिटलमध्ये दिला जातो हलका रंग 

आपल्या आयुष्यात रंगांना खूप महत्त्व आहे. रंग आपण डोळ्यांनी पाहतो मात्र याचा थेट प्रभाव आपल्या शरीरावर आणि आरोग्यवर देखील पडत असतो. याच रंगांमुळे आपला मुड त्याचबरोबर आपल्या आसपासच्या रंगांमुळे आपल्या शरीरातील उर्जास्त्रोत कायम प्रभावित होत असतात. प्रत्येक रंगाचा प्रतीकात्मक अर्थ देखील असतो. म्हणूनच रंगांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.  

महत्त्वाची बातमी : झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..

याबाबत अनेकांनी आभ्यास केलाय. आभ्यासाकांच्या मते आपल्या आयुष्यावर कायमच रंगांचा परिणाम होत असतो हे सिद्ध झालंय. आपण जेव्हा आजारी असतो किंवा एखाद्या शारीरिक त्रासाचा सामना करत असतो तेंव्हा देखील रंगांचा वापर करून आपण त्यातून बाहेर पडू शकतो. कोणत्याही आजाराला बरं करण्यासाठी औषधांच्या आधी त्या औषधांच्या रंगाचा मनावर, मेंदूवर आणि आरोग्यावर परिणाम पडत असतो.
    
सर्वात आधी औषधांचा रंग आल्या मेंदूला त्या औषधांबद्दल संदेश पाठवत असतो. उदाहरणार्थ कुणाला रात्री झोप येत नसेल तर त्याला फिकट निळ्या रंगाची कॅप्सूल जास्त प्रभावी राहते. किंवा जर कुणाला अॅसिडिटी झाली असेल आणि त्याला निऑन हिरव्या रंगाची कॅप्सूल किंवा गोळी दिली तर अनेकजण ती घोळी घेताना टाळाटाळ करतात. कारण आपल्या डोक्यात निऑन रंग म्हणजे साइट्रिक एसिड किंवा एखादा आंबट पदार्थ असं फिक्स असतं. आणि म्हणूनच अनेक जण या गोळ्या घ्यायला कचरतात.    

हेही वाचा :  लग्नाच्या आणाभाका करत आला अन भलतच करुण गेला

प्रत्येक रंगाचा वेगळा प्रभाव असतो. असं म्हणतात लाल रंगामुळे आपला पल्स रेट, ब्लड प्रेशर आणि श्वासोच्छवास वाढवतो. निळा किंवा पांढऱ्या रंगामुळे आपल्याला शांतात मिळते. म्हणून निळ्या रंगाचा वापर डोकेदुखी, एखादी वेदना किंवा तणाव यासारख्या आणि इतर परिस्थितीमध्ये केला जातो. 

जर कुणी डिप्रेशन मध्ये असेल तर त्यांना डिप्रेशन कमी करण्यासाठी मरून किंवा गडद तपकिरी रंगांची गोळी दिली गेली तर बऱ्याचदा त्या गोळीचा प्रभाव झालेला पाहायला मिळत नाही किंवा अनेकदा डिप्रेशनमधील व्यक्ती या गोळ्या घेतच नाहीत. रुग्णांच्या आसपासच्या रंगांमुळे देखील त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. निळा किंवा निळा-हिरवा या रंगसंगतीमुळे आसपासचं वातावरण शांततापूर्ण वाटतं.  म्हणूनच हॉस्पिटल्सच्या भिंती या कायम सफेद, निळा किंवा हलक्या रंगांमध्ये रंगवलेले असतात.  

हेही वाचा : नवी मंबईतील ‘या’ परिसरात नागरिक धास्तावले! पाहा नेमकं काय झालंय..

याशिवाय वयस्कर लोकांच्या खोल्यांमधील रंग त्यांना आणि त्यांच्या आरोग्यावर प्रभावित करत असतात. जर त्यांच्या खोल्यांमध्ये चमकदार किंवा भडक रंग वापरलेत तर त्यामुळे वयस्कर लोकांची चिंता किंवा घबराहट वाढवू शकतात. तर लहान मुलांच्या खोल्यांमध्ये पिवळा किंवा नारंगी रंग लावला तर तो लहान मुलांना काही आजार असतील तर ते बरं करण्यात हातभार लावतो आणि फ्रेश ठेवतो.  

आपल्याला मिळणाऱ्या विविध औषधं ते कोणत्या आजारावर देण्यात येतंय आणि लोकांच्या मनस्थितीचा आभ्यास करून ठरवले जातात.  

WebTitle : why there are various colours given to the tablet know colour code


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why there are various colours given to the tablet know colour code