मुंबई लोकलची हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. एका नशेखोर तरुणामुळे हार्बर रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. यामुळे आता प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या विद्युत तारांवर नशेखोर तरुण चढून बसला होता. विद्युत तारांवर नशेखोर तरुण चढल्यामुळे गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते. खार आणि वांद्रे दरम्यान असणाऱ्या विद्युत तारांवर तरुण चढल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती..आणखी एक Airport तयार! नवी मुंबई विमानतळ आकाशात 'अधिराज्य' गाजवण्यास सज्ज, पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग.घटनेची माहिती आरपीएफ आणि जीआरपीला देण्यात आली. त्यानंतर तातडीने आरपीएफ आणि जीआरपी घटनास्थळी दाखल झाले. आरपीएफ आणि जीआरपी यांनी एकत्रित कारवाई करून नशेखोर तरुणाला खाली उतरवले. सध्या हा नशेखोर तरुण आरपीएफच्या ताब्यात असून आरपीएफकडून पुढील कारवाई सुरू आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.