मुंबईत आज राजावाडी, कूपर आणि बीकेसीत लसीकरणासाठी ड्राय रन

भाग्यश्री भुवड
Friday, 8 January 2021

आज मुंबई महापालिकेद्वारे राजावाडी, कूपर रुग्णालयात तसेच बीकेसी येथील कोविड सेंटर अशा तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे.

मुंबई: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. यानुसार मुंबई महापालिकेद्वारे राजावाडी, कूपर रुग्णालयात तसेच बीकेसी येथील कोविड सेंटर अशा तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कोविन अॅप किती सोईस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने आणि त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जातो असेही ते म्हणाले. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पूर्व तयारी पूर्ण

या मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली असून चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी आणि आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे आणि शितसाखळी केंद्राला कळवणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस आणि वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबईत हवा अतिशय वाईट, प्रदूषणात दिल्लीला ही टाकले मागे

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dry run for vaccination Rajawadi  Cooper bkc Mumbai today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry run for vaccination Rajawadi Cooper bkc Mumbai today