दारु मिळेना... म्हणून तळीराम लढवतायेत ही शक्कल!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

राज्यात 144 कलम आणि जीवनाश्‍यक वस्तू विक्रीकरिता फक्त परवानगी यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. मद्याची दुकाने, बार बंद यामुळे जिल्ह्यात तळीरामांची तडफड सुरू आहे. तळीरामांची पावले हातभट्टीकडे वळण्याची शक्‍यता आहे. 

नवी मुंबई : राज्यात 144 कलम आणि जीवनाश्‍यक वस्तू विक्रीकरिता फक्त परवानगी यामुळे सर्वच व्यवहार थंडावले आहेत. मद्याची दुकाने, बार बंद यामुळे जिल्ह्यात तळीरामांची तडफड सुरू आहे. तळीरामांची पावले हातभट्टीकडे वळण्याची शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचली का?  ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

मध्यंतरी सरकारने राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्गापासून 500 मीटर अंतरातील मद्यविक्री करणारे दुकान बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर खालापुरात मद्याची दुकाने एखाद्‌-दुसरा अपवाद वगळता बंद झाली होती. खालापूर तालुक्‍यातून दुसऱ्या तालुक्‍यात मद्य खरेदीसाठी जाणारे महाभाग होते; परंतु आता कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, घरात बसण्याची पाळी आली आहे. रोज दोन घोट तरी पोटात रिचवायची सवय असलेल्या तळीरामांची तडफड सुरू असून, सर्वच लॉकडाऊनमुळे पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. खालापूर तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत हातभट्टीवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने हातभट्टीचा झरा आटला आहे. खालापूर पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांनी दुर्गम भागातही कारवाई करीत हातभट्टी उद्‌ध्वस्त केल्या होत्या. आता नजीकच्या कर्जत तालुक्‍यातून हातभट्टीचे मद्य येण्याची शक्‍यता असून, दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी तळीरामाची पावले गावठी मद्याकडे वळू शकतात. 

ही बातमी वाचली का? कोरोना निवारणासाठी एक दिवसाचा पगार

समाज माध्यमांतून दुपारी 3 ते 4 मद्यविक्री दुकाने उघडी राहतील असा खोटा संदेश फिरत आहे. अशा खोट्या संदेशावर विश्‍वास ठेवू नये. फक्त जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने उघडी असणार आहेत. 
- एम. चाटे, उत्पादन शुल्क अधिकारी, खालापूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corona people search alcohol