esakal | ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत असताना, एकही कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित नाही. त्यामुळे संशयित कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जातात. त्यातून रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता सरकारने ठाण्यात एक; तर नवी मुंबईत दोन कोरोना चाचणी केंद्र मंजूर केले आहेत.

ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत असताना, एकही कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित नाही. त्यामुळे संशयित कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जातात. त्यातून रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता सरकारने ठाण्यात एक; तर नवी मुंबईत दोन कोरोना चाचणी केंद्र मंजूर केले आहेत. जिल्ह्यात एकूण तीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? Big Bajar चा मोठा निर्र्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य, भाज्या...

ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचे दिसून येत आहे; तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी एकही तपासणी केंद्र नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ठाणे जिल्ह्यात तीन खासगी कोरोना चाचणी केंद्रांना मंजुरी दिली. 

ही बातमी वाचली का? टवाळखोरांना रोखण्यासाठी कर्र्जतमध्ये नाकाबंदी 

यामध्ये नवी मुंबईतील तुर्भे येथील थायरोकेअर टेक्‍नॉलॉजी लिमिटेड आणि एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर- रबाळे या दोन खासगी केंद्रांना; तर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इनफेक्‍स लॅबोरेटरी लिमिटेड या खासगी केंद्राला कोरोना चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी केंद्रांना मान्यता मिळाल्याने आता यापुढे संशयितांची तपासणी करण्यासाठी मंबईला जाण्याची पायपीट थांबणार आहे. त्याचबरोबर वेळेत तपासणी करणे शक्‍य होणार आहे. 

loading image