मोठी बातमी - सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर हजर राहण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असुन, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे या सर्वांचा ताण पोलिस दलावर पडत आहे. तर अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी सुट्टीवर असुन, यासर्वाना हजर राहण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 

मुंबई - मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असुन, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे या सर्वांचा ताण पोलिस दलावर पडत आहे. तर अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी सुट्टीवर असुन, या सर्वांना कामावर हजर राहण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 

सर्व पोलिस अधिकारी-कर्मचार्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात १२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात ही आकडेवारी दिवसागणिक वाढत असुन, त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र याचा सर्व ताण हा पोलिस दलावर पडण्यास सुरुवात झाली आहे.

मोठी बातमी रंगुळा म्हणून त्यानं #WhatsApp ग्रुपवर टाकलं 'मला कोरोना झालाय', मग पोलिसांनी...

पोलिस दलात आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यातच अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुट्टीवर आहेत. यामुळे जे हजर आहेत त्यांना अधिक काम करावे लागत असुन, याचा सर्व ताण उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलिस अधिकारी-कर्मचाऱयांच्या सुट्टया पोलिस आयुक्तांनी रद्द केल्या आहेत.

मोठी बातमी नोटांमुळे कोरोना पसरू शकतो का ? वाचा WHO चं काय म्हणणं आहे...

तसेच या सर्व पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस दलात प्रत्येक पोलिस ठाण्यात तसेच विभागात दोन पथके तयार केली आहेत. प्रत्येक विभागात 50 टक्के अधिकारी-कर्मचारी अनिवार्य केले आहेत. मात्र अनेकजण सुट्टीवर गेले आहेत, तर लॉकडाऊनचे आदेश पाळण्यासाठी रस्त्यावर पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. अशात अनेक हुल्लड नागरीक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याने, कोरोनाच्या संसर्गाची भिती व्याक्त करण्यात येत आहे. यामुळेच पोलिस आयुक्तांनी सुट्टीवर गेलेल्या पालिसांच्या सुट्टया रद्द करीत त्यांना ड्युटीवर हजर राहण्यचे आदेश दिले आहेत. 

due to corona threat maharashtra police canceled leaves of all police officer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corona threat maharashtra police canceled leaves of all police officer