esakal | विरंगुळा म्हणून त्यानं WhatsApp ग्रुपवर टाकलं 'मला कोरोना झालाय', मग पोलिसांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

विरंगुळा म्हणून त्यानं WhatsApp ग्रुपवर टाकलं 'मला कोरोना झालाय', मग पोलिसांनी...

"मला कोरोनाची लागण झाली आहे,  मात्र माझी प्रकृती अजून खराब होत नाही तोपर्यंत मी रुग्णालयात जाणार नाही" असा मेसेज त्याने केला आणि...

विरंगुळा म्हणून त्यानं WhatsApp ग्रुपवर टाकलं 'मला कोरोना झालाय', मग पोलिसांनी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: भारतात सध्या कोरोनची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनं पुढच्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे तर अनेकांना थेट सुटी देण्यात आली आहे. अशा कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत फक्त मजा म्हणून म्हणून लोकं काय करतील याचा काहीही नेम नाही.

लोकांना येत्या १५ एप्रिलपर्यंत या लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. कोणीही घराच्या बाहेर निघू नये असे आदेश असल्यामुळे लोकांवर कंपलसरी घरातच बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता काही लोकं विरंगुळा म्हणून सोशल मीडियावर खोटे मेसेज पसरवत आहेत. अशाच एका व्यक्तीवर ठाणे पोलिसांनी कोरोनाबद्दलचा खोटा मेसेज पाठवला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

लढा कोरोनाशी 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दोनदा पगार

नक्की झालंय काय ? 

ठाण्यात राहणाऱ्या या व्यक्तीनं त्याच्या एका Whats app वर  "मला कोरोनाची लागण झाली आहे,  मात्र माझी प्रकृती अजून खराब होत नाही तोपर्यंत मी रुग्णालयात जाणार नाही" असा मेसेज केला होता. त्याच्या या अशा मेसेजमुळे त्याला ओळखणाऱ्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. या मेसेजबद्दल पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी एका क्षणाचाही विलंब न करता या व्यक्तीच्या घराकडे धाव घेतली. यात ही व्यक्ती खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं.  

लढा कोरोनाशी : मुंबईच्या दाट लोकवस्तीत राहणारी महिला कोरोनामुक्त; परिसरदेखील आहे कोरोना निगेटिव्ह

अजून या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही.  मात्र या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवणारे मसेज पसरवू नका असं सतत सांगण्यात येतंय. या मेसेजमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होऊ शकते. तसंच काही जणांची प्रकृतीही खराब होऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून असे खोटे मेसेज न पसरवण्याचं वारंवार आवाहन केलं जातंय. असे मेसेज पाठवणाऱ्यांवर आता कडक कारवाईला देखील सुरवात झालीये. 

for fun person from thane messages that he has corona thane police took serious action

loading image