मुंबईत ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र वितरण बंद, 'असा' वाचा सकाळचा ई-पेपर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मुंबई : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. संपूर्ण जगात तब्बल २०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोना COVID19 मुळे झाला आहे. तर भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६० च्या वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केलीये.

देशात लॉकडाऊनची स्थिती असतानाही वर्तमानपत्रं आणि न्युज चॅनेल जनतेला योग्य ती माहिती पुरवण्यात तत्पर आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही पत्रकार आपलं कर्तव्य जीवाची बाजी लावून पार पाडत आहेत. कोरोनामुळे वर्तमानपत्र आणि न्युज चॅनेलमध्ये ५०-५० फॉर्मुलानुसार पत्रकार काम करत आहेत. मुंबईत वाहतुकीच्या सर्व सेवा बंद झाल्या आहेत.

तुमच्या आवडत्या 'सकाळ' वर्तमानपत्राचा आजचा अंक वाचण्यासाठी याच लिंकवर  क्लिक करा... 

त्यामुळे सरकारनं मुंबईतील सर्व वर्तमान पत्रांचं वितरण ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असा निर्णय घेतला होता. मात्र आता सुभाष देसाई यांनी मुंबईत वर्तमानपत्र वितरण ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असा निर्णय घेतला आहे. त्यानंतर वर्तमानपत्र सुरु करण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे असं देखील देसाई म्हणालेत. 

सर्व वर्तमान पत्रांचं वितरण जरी बंद असले तरी त्यांचे ई-पेपर मात्र सुरु असणार आहेत. त्यामुळे वाचकांना नेहमी सारखा नाही पण ई-पेपर वाचावा येऊ शकेल. 

due to corona threat newspaper distribution stopped till 31st march in mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corona threat newspaper distribution stopped till 31st march in mumbai