कोरोनाच्या भीतीपोटी गरोदर महिलांची झाली मोठी पंचाईत, शेवटी घेतला 'हा' निर्णय...

कोरोनाच्या भीतीपोटी गरोदर महिलांची झाली मोठी पंचाईत, शेवटी घेतला 'हा' निर्णय...

मुंबई - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात Covid19 रुग्णालय करण्यात आले आहे. त्यात या रुग्णालयातील भूलतज्ज्ञ अचानक आजारी पडल्याने जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित गरोदर मातांची संख्या लक्षात घेता, ठाणे भूलतज्ज्ञ संघटना आणि ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून भूलतज्ञ मिळावे, अशी मागणी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी जिल्हा रुग्णालयात येण्यास कोणी पुढे येत नसल्यामुळे अखेर जिल्हा रुग्णालयातील तीन गरोदर महिलांना मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्याची नामुष्की जिल्हा रुग्णालय प्रशासनावर आली आहे. 

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दोन स्त्री रोगतज्ज्ञ आणि एक भूलतज्ज्ञ यांची नेमणूक केली आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांची रुग्णालयात दाखल होण्याची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात सहा कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांची प्रसूती यशस्वी पार पडली. मात्र, येथील कार्यरत भूलतज्ज्ञ अचानक आजारी पडल्या असताना दुसरीकडे रुग्णालयात दाखल तीन गरोदर मातांवर सीझर करण्याची वेळ ओढवली आहे. 

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने भूलतज्ज्ञ संघटनेसह पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांशी संपर्क साधला. पण, कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही भूलतज्ञ उपलब्ध होऊ न शकल्याने त्या तीन महिलांना तातडीने मुंबईतील नायर रुग्णालयात पाठविण्याची नामुष्की जिल्हा सामान्य रुग्णालयावर ओढावली. 

भूलतज्ज्ञ आजारी पडल्यान ठाणे भूलतज्ज्ञ संघटना आणि ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयाकडे भूलतज्ज्ञ मिळावे अशी मागणी केली होती. त्यातच मंगळवारी कळवा रुग्णालयाने तात्पुरती व्यवस्था केली. पण, संघटनेने अद्यापही पुढाकार घेतला नाही. असं ठाणे जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी म्हटलंय. 

जिल्हा रुग्णालयाने स्त्रीरोग आणि भूलतज्ज्ञ यांची मागणी केली होती. कळवा हे एकमेव नॉनकोव्हिड रुग्णालय असल्याने आमच्या रुग्णालयावरही ताण वाढला आहे. तरीसुद्धा मंगळवारी आम्ही भूलतज्ज्ञ पाठवले होते. आम्ही यापुढे डॉक्टर देणार नाहीत. याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांकडे चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. -डॉ. प्रतिभा सावंत, कळवा रुग्णालय.

due to covid19 fear scarcity of anesthesia specialist in non covid hopital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com