बसेसचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप, ST स्थानकावरील चौकशी केंद्रे नॉट रीचेबल

 बसेसचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप, ST स्थानकावरील चौकशी केंद्रे नॉट रीचेबल

मुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एसटी बंद होती. त्यांनतर सुरुवातीला 50 टक्के प्रवासी वाहतूक आणि आता 100 टक्के प्रवासी वाहतुकीचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यामुळे राज्यातील एसटीच्या वेळापत्रक सुद्धा विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून फोनवरच बसचे वेळापत्रक विचारण्यासाठी बस स्थानकावरील चौकशी केंद्रांवर फोन केल्यास फोनच नॉटरीचेबल असल्याचे सांगितल्या जात आहे. शिवाय गडचिरोली प्रवाशांचा फोन थेट मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयातील कॉल सेंटरवर लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

कोरोनाकाळाच्या पूर्वी एसटी महामंडळाचे दैनंदिन 65 लाख प्रवासी संख्या होती. मात्र सध्या प्रवासी संख्येत घट होऊन फक्त 8 लाख प्रवासी एसटीने प्रवास करत आहे. तर लॉकडाऊन झाल्याने एसटीच्या उत्पन्नावरही प्रचंड परिणाम झाला आहे. सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांवर डिझेल खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सर्वात मोठी समस्या आहे. एसटी बस स्थानकाबाहेरून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सुद्धा एसटीच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

त्यानंतरही एसटी प्रशासन प्रवासी संख्या वाढविण्यात अपयशी ठरत आहे. प्रवासी वाढविण्यासाठी एसटी प्रशासन अनेक उपाययोजना करतांना दिसून येत असले तरी, प्रत्यक्षात त्याचा फायदा शून्यच असल्याचे दिसुन येत आहे. बस स्थानकावरील प्रवाशांना योग्य तसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजास्तव एसटी प्रवासी आता खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळताना दिसतो आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला मायक्रो नियोजन करणे गरजेचे आहे.

अनियोजित कारभारामुळे दुरावतोय एसटी प्रवासी 

एसटीमध्ये वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना एसटी बस स्थानकावरील चौकशी केंद्रावर बसवले आहे. ज्यांना कोणत्याही प्रकारचे संगणकीय शिक्षण नसल्याने ऑनलाइन एसटीच्या वेळा कळत नाही. त्याशिवाय एसटीच्या वेळा सांगण्यासाठी किंवा प्रवाशांचे समाधान करण्यासाठी प्रवाशांकडून फोनद्वारे संपर्क केल्यास प्रतिसाद सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे आपोआपच एसटी प्रवासी संख्येत घट होत आहे. 

टोल फ्री क्रमांकही बंद 

एसटी महामंडळातील प्रवाशांना प्रवासादरम्यान किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात माहिती घ्यायची असल्यास एमएसआरटीसी च्या वेब साईटवर 1800221250 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र हा नंबर सुद्धा बंद आहे.

महत्त्वाची बातमी : बिहार निवडणूक 2020: शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी

एमएसआरटीसीच्या ट्विटर हँडलवरही तक्रारी 

एसटीचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने एसटी प्रवाशांना योग्य माहिती मिळत नाही. त्याशिवाय एसटीच्या इतर ही तक्रारीसाठी आणि एसटीच्या वेळा विचारण्यासाठी एमएसआरटीसीच्या ट्विटर हँडलवर सुद्धा प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहे. मात्र, सध्या या तक्रारीची दखल सुद्धा महामंडळात घेतली जात नाही.

एसटीची प्रवासी संख्या वाढविण्याचा सर्वतोपती प्रयत्न सुरू आहे. यासाठी अनेकांकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना अंमलात आणण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवाशांना बस स्थानकावरील चौकशी केंद्राकडून जर प्रवाशांना प्रतिसाद मिळत नसेल तर हे चुकीचे आहे. मात्र, यासंदर्भात त्वरित चौकशी करून तशा सूचना दिल्या जाणार आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

( संपादन - सुमित बागुल )

due to disturbed time table of ST travelers facing problems enquiry counters not reachable

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com