esakal | सरकारच्या धोरणामुळे मध्यम आकाराची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर- IMA 
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारच्या धोरणामुळे मध्यम आकाराची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर- IMA 

सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावीत, रुग्णालयांचा खर्च परवडणात नसल्याने नाराजी

सरकारच्या धोरणामुळे मध्यम आकाराची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर- IMA 

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : सरकारने खासगी रुग्णालयावर लादलेल्या दरामुळे कोविड रुग्णालये चालवणे मुश्किल झाली आहेत. सरकारच्या दर सक्तीमुळे लघु आणि मध्यम स्वरूपाच्या खासगी रुग्णालयांवर कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने सर्व खासगी रुग्णालये सरकारनेच चालवावीत असे सरकारला थेट आवाहन केलं आहे. 

दरम्यान, मध्यम स्वरूपाची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या प्रतिनिधीने दिली. सरकारने ICU दर वाढवुन देणे, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट शुल्क आणि वीज बिलामध्ये सवलत देणे असे मुद्दे कबूल केले होते. डॉक्टर वापरात असलेले पीपीई किट आणि मास्क दरात नियंत्रणात ही आणण्याचे मान्य केले होते. शिवाय, ऑक्सिजन दरही केंद्र सरकारच्या नियमानुसार कमी करणार असल्याचे सांगण्यात आले. 

महत्त्वाची बातमी - आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

मात्र, या सर्व मुद्द्यांना बगल देत सरकारने नवे दर लागू केले असून ते अधिक कडक असल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले. डॉक्टर रुग्णांना लुटत असल्याचा उलट आरोप वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आयएमए डॉक्टरांकडून वारंवार तन मन वाहून सेवा करण्यात आली आहे. सरकारच्या डॉक्टरांप्रती असलेल्या वागणुकीचा आयएमएने निषेध केला.

सर्व पॅथीतील वैद्यकीय संस्थांची बोलावलेल्या बैठकीत आयएमएला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. येत्या सात दिवसात सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील असे ठरविण्यात आले असल्याचे आय IMA महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

due to governments policy more than two thousand five hundred small and medium hospitals are on the verge of shutdown