​मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका; अनेक गाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला.

मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला.

11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-कोल्हापूर, 22101 सीएसएमटी-मनमाड, 17617 सीएसएमटी-नांदेड,01033 सीएसएमटी-रत्नागिरी आणि 01035 पनवेल-सावंतवाडी या गाड्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय बुधवारी मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्यांचा प्रवास मधल्या स्थानकात थांबविण्यात आला.

12140 नागपूर-सीएसएमटी ठाणे स्थानकात, 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकात, 17618 नांदेड-सीएसएमटी नाशिक रोड आणि 11402 नागपूर-सीएसएमटी ट्रेन मनमाड स्थानकापर्यंतच चालविण्यात आल्या. अनेक गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Heavy rains Many trains canceled