लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीला आळा, हत्या, डाके यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घट

लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीला आळा, हत्या, डाके यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घट

मुंबई, ता. 20ः लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या गतीला ब्रेक लागला होता, या काळात शहरातील हत्या, जबरी चोरी, सोनसाखळीचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याशिवाय महिलांवरील अत्याचाराच्या घटना 41 टक्के आणि चोरीच्या घटना 47 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली दुकाने चोरट्यांनी फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी पाहता, हुंड्यासाठी छळाच्या घटना 51 टक्क्यांनी, तर हुंडाबळी संबंधित घटनांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाल्यात. गेल्या वर्षी याच कालावधीत 668 घटना घडल्या होत्या, यावर्षी त्यात घट झाली आहे. यंदा 440 घटना घडल्या आहेत. मागील वर्षी विनयभंगाच्या घटना एक हजार 785 इतक्या होत्या, त्या यंदा एक हजार 116 वर आल्यात. महिला आणि मुलांच्या अपहरणांच्या गुन्ह्यांतही घट  झाली आहे. गेल्या वर्षी 924 घटना घडल्या होत्या. या वर्षी या कालावधीत 478 घटना घडल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. दुसरीकडे याच कालावधीत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

वाहन चोरीच्या घटना मे महिन्यात अधिक

लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यामधील वाहन चोरीची आकडेवारी पाहिली, तर प्रत्येक दिवसाला सरासरी पाच वाहनांची चोरी होत होती. मे महिन्यात मुंबईत वाहन चोरीप्रकरणी 158 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात केवळ 84 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. वाहन चोरीमधील 60 टक्क्यांहून अधिक गुन्हे  दुचाकी चोरीचे आहेत. दुचाकी चोरून लवपणे सोपे जाते, तसेच हे चोरटे अगदी पाच हजार रुपयांनाही या दुचाकी विकतात. तसेच काहीवेळा त्याचे महत्त्वाचे भाग वेगळे करून विकले जातात. लॉकडाऊनच्या काळात दळणवळणाचे साधन नसल्यामुळेही लॉकडाऊनमध्ये वाहने चोरी झाल्याचा अंदाज एका अधिका-याने सांगितले. 

( संपादन - सुमित बागुल )

due to lockdown serious criminal activities are reduced in mumbai but online frauds increased

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com