esakal | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनमुक्त, अहवाल आला निगेटिव्ह; केक कापून घरी स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनमुक्त, अहवाल आला निगेटिव्ह; केक कापून घरी स्वागत

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनमुक्त, अहवाल आला निगेटिव्ह; केक कापून घरी स्वागत

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.20: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहाणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना 10 सप्टेंबररोजी कोविडची बाधा झाल्याचे आढळून आले होते. त्यांना कोविडची सौम्य लक्षण होती. महानगरपालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यांंवर उपचार सुरु होते. 

आज Mayor Kishori Pednekar यांचा कोरोना कोविड19 चाचणीचा ताजा अहवाल आला असून तो  नोगेटिव्ह असल्यानेे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे.आज तब्बल 10 दिवसांनी मुंबईच्या महापौर कोरोनावर मात करून आपल्या घरी परतल्या तेंव्हा त्यांचं औक्षण करून आणि केक कापून स्वागत केलं गेलं. 

पुढील सात दिवस किशोरी पेडणेकर भायखळायेथील महापौर बंगल्यात गृहविलगीकरणात राहाणार आहेत. गृहविलगीकरणाचा  काळ संपल्यानंतर नागरीकांच्या  सेवेत  जोमाने सहभागी होईन असं महापौरांनी सांगितले.

'या' महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले

-- अनुराग कश्यप यांनी सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केलीये - निलेश राणे

-- मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा अट्टाहास कशासाठी? दरेकरांचा हल्लाबोल

-- "उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं" - अनुराग कश्यप

-- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग
 

( संपादन - सुमित बागुल )  

BMC mayor kishori pednekars covid reports are negative she will be home quarantined for next seven days