राज्यात प्रथमच...हे झाले, 'या' अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!

राज्यात प्रथमच...हे झाले, 'या' अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!
राज्यात प्रथमच...हे झाले, 'या' अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!

नवी मुंबई : उरण तालुक्‍यातील पागोटे आणि भेंडखळ येथील खारफुटीची कत्तल आणि पाणजे पाणथळीवर भराव टाकल्याप्रकरणी नवी मुंबई सेझच्या अधिकाऱ्यांवर उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील खारफुटी तोड केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून विकसित करण्यात येत असलेल्या 5300 एकर क्षेत्रफळाच्या नवी मुंबई सेझ अंतर्गत भेंडखळ, पागोटे आणि पाणजे हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसर येतो. त्यातील पागोटे येथील आठ एकर खारफुटी क्षेत्रापैकी तीन एकर क्षेत्रातील खारफुटी नष्ट करण्यात आल्याची तक्रार महसूल अधिकारी मच्छिंद्र मोहिते यांनी दाखल केली आहे; तर भेंडखळ येथील दीडशे एकर जागेवरील खारफुटीची कत्तल करण्यात आल्याची तक्रार स्थानिक तलाठ्यांनी केली आहे. याशिवाय पाणजे येथील संरक्षित पाणथळीवर डेब्रिज आणि मातीचा भराव टाकण्यासाठी वाहतूक करणारा डम्परचालक दशरथ राठोड यांच्या विरोधात तलाठी श्‍यामा पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही परवानगीशिवाय हा भराव टाकत असल्याचे यासंदर्भातील तक्रारीत म्हटले आहे. पर्यावरणप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे, नेचर कनेक्‍ट या संस्थेचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. 

या तक्रारींमध्ये नवी मुंबई सेझच्या अधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले असल्याचे कुमार यांना मिळालेल्या तक्रार अर्जातून समोर आले आहे. मात्र, त्यात स्पष्टपणे कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. पर्यावरण कायद्याच्या कलम 15 आणि 19 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाखपर्यंत आर्थिक दंड केला जाऊ शकतो. 

ही बातमी वाचली का? हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर पोलिसांनी घेतला हा निर्णय..
 
सीआयडी चौकशीची मागणी 

हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने, तसेच यात अनेक उच्च पदस्थांचे हितसंबंध गुंतले असल्याने त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी कुमार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या परिसरातील पर्यावरण हानीची छायाचित्र आणि चित्रफितीदेखील मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. 
 
या तक्रारी हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. याला सिडकोही जबाबदार आहे. कारण या सेझमध्ये सिडकोही भागीदार आहे. 
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com