कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, कॉलेजेस बंद

विनोद राऊत
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई - राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. १३ मार्चपासून हा कायदा राज्यात लागू झालाय. या कायद्यातील खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार सरकारने अधिसुचना निर्गमीत केली आहे. या अंतर्गत स्वतंत्र नियमावलीही तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याशिवाय राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

मोठी बातमी - मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कारण आहे...

सर्व शाळा कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद 

राज्य सरकारने राज्यातल्या सर्व अंगणवाड्या दिनांक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील सर्व महापालिका, सर्व नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. 

शाळा, महाविद्यालये बंद, परिक्षा मात्र वेळेत होणार

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. यामध्ये महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान १० व १२ वीच्या परिक्षा तसेच विश्वविद्यालयातील परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

VIDEO - तब्ब्ल ८८ प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट मांडवा जेट्टीजवळ बुडाली

सार्वजनिक कार्यक्रम रद्द करा 
नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, धार्मिक, क्रिडाविषय कार्यक्रमांना पुढचा आदेश होईपर्यंत परवानगी देऊ नये असा आदेशही काढण्यात आला आहे. यापुर्वी अशा कार्यक्रमांना परवानगी दिली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय़

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to threat of corona virus all anganwadi schools will remain close till 31st march