
उरण (वार्ताहर) : सकाळपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारच्या सुमारास धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. आज दुपारच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.