

Kharghar Water Shortage
ESakal
खारघर : येथील अनेक रहिवासी सोसायट्यांना सिडकाेतर्फे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. अनेक सोसायट्यांना खासगी टॅँकर विकत घ्यावे लागत असल्याने त्यांचा खर्च काेट्यवधींच्या घरात पाेहाेचला आहे. या परिसरातील एका साेसायटीला दीड वर्षात एक काेटीहून अधिक रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिका ५० रुपयांत एक हजार लिटर पाणी देत असताना शेजारीच असलेल्या खारघरवासीयांचा खिसा पाण्यासाठी रिकामा हाेत आहे.