
मुंबई : मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी मुंबईला अक्षरशः ठप्प केले. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांप्रमाणेच रेल्वे रुळांवरही पाणी साचले. दादर, कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य व हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. दिवसाअखेरीस ५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर २५० पेक्षा जास्त गाड्या उशिराने धावत होत्या.