नवी मुंबईत रूग्ण दुपटीचा कालावधी 357 दिवसांवर; डिसेंबरमध्ये कोरोना वाढीचा वेग नियंत्रित

नवी मुंबईत रूग्ण दुपटीचा कालावधी 357 दिवसांवर; डिसेंबरमध्ये कोरोना वाढीचा वेग नियंत्रित

वाशी -  नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीन कोरोना नियंत्रणासाठीे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचीही साथ मिळत असून दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याचा धोका संभवण्यात येत होता. मात्र कोरोना रूग्णसंख्येत तितकीशी  वाढ होत नसल्याने नवी मुंबई करांना दिलासा मिळालेला आहे. तरी नागरिकांनी गाफील न राहता मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

दिवाळीनंतर कोरोना रुगण वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने कोव्हीड 19 च्या  चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला देता. दिवाळीनंतर चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. 23 स्थायी चाचणी केंद्रामध्ये आता दोन अद्ययावत चाचणी वाहनांची भर टाकण्यात आलेली आहे. तसेच एपीएमसी मार्केट व एमआयडीसी क्षेत्राप्रमाणेच 5 रेल्वे स्टेशन्सवरही कोव्हीड चाचण्यांची विशेष केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कोरोना बाधितांवर सुयोग्य उपचार होण्यासाठी नियोजनबध्द व्यवस्था केलेली असून 4 महिन्यांच्या कालावधीत त्यापूर्वी उपलब्ध ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्स व आरोग्य सुविधांत तिपटीने वाढ केलेली आहे. ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या कमी होत चालल्याने महानगरपालिकेच्या 9 कोव्हीड केअर सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रूग्ण दाखल करणे थांबविण्यात आले असले तरी गरज भासली तर केवळ 2 दिवसांत ती केंद्रे पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.

नोव्हेंबर महिन्यात कोव्हिड च्या 72 हजार 771 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 3 हजार 730 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. म्हणजेच केलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 5.12% इतके होते. तर  1 डिसेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत 31 हजार 645 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 1 हजार 136 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर च्या तुलनेत डिसेंबर मध्ये  कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 3.58 टक्के इतके कमी झालेले आहे.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 डिसेंबरपर्यंत एकूण 49 हजार 387 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी 47 हजार 46 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर एकूण  1007 रूग्णांचा  मृत्यू झालेला आहे. तर नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 95.25 टक्के  हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.03 टक्के  प्रमाण आहे.
 

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 1136 पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून 1384 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 23 रूग्णांचा मृत्यू झालेला असून मृत्यूदर 2.02 टक्के आहे.  या उपाययोजनांची परिणिती म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी 263 दिवसांवर असलेला  रूग्णदुपटीचा कालावधी  10 दिवसात 357 दिवस इतका सुधारलेला आहे.*
 

मृत्यूदरही नियंत्रणात
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 डिसेंबर रोजी 1 हजार 334 म्हणजे 2.70 टक्के   इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत ॲक्टिव्ह आहेत. 30 नोव्हेंबरच्या तुलनेत  1 हजार 605 रूग्ण म्हणजे  3.32  टक्के प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत घट झालेली आहे.

 

चौकट कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक लसीची उपलब्धता दृष्टीपथात येत असली तरी तोपर्यंत कोरोनापासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्रीच महत्वाची आहे. नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमांतून याविषयी जनजागृती करीत आहे तसेच प्रतिबंधात्मक दंडात्मक कारवाई देखील करीत आहे. तथापि अद्यापही काही नागरिक गांभीर्य पाळताना दिसत नाहीत. तरी स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात न आणता प्रत्येकाने आरोग्य त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे
 अभिजीत बांगर,
आयुक्त  नमुंमपा

The duration of patient doubling in Navi Mumbai is 357 days
---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com