
डोंबिवली : कल्याण मधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी निकाला नंतर श्री मलंगगड मुक्तीचा नारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी मध्ये मलंगगडाला मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार येताच किल्ले दुर्गाडीचा निकाल लागला आहे. यानंतर आता मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती निमित्त भाजपच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड या गडावरील उत्सवात सहभागी झाल्या.