डॉक्टर तुम्हीसुद्धा ! आता डॉक्टर पण करू शकतात 'वर्क फ्रॉम होम', मेडिकल असोसिएशनची भन्नाट शक्कल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्या वेळी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास कारवाईचा इशारा दिला.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अवघ्या 10-15 फुटांची डिस्पेन्सरी वा नर्सिंग होम, छोट्या रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील डॉक्टरांना सातवत होता. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे इंडियन मेडिकल असोसिएशनने अनोखी युक्ती लढवत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णांना आरोग्याच्या तक्रारी मांडता येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टळणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. दिनकर देसाई यांनी दिली.

मोठी बातमी - 'कोरोना'बाधिताना किती फायद्याची आहे 'हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन'ची गोळी ? डॉक्टर म्हणतायत... 

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्या वेळी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास कारवाईचा इशारा दिला. या आदेशाने ठाणे शहरातील नर्सिंग होमचालक डॉक्टर व जनरल प्रॅक्टीस करणारे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यात बहुसंख्य डॉक्टरांचे दवाखाने दुकानांच्या गाळ्यात सुरू आहेत. 1 हजार फुटांपेक्षा कमी जागेत नर्सिंग होम सुरू आहेत. बहुसंख्य डिस्पेन्सरी 10 ते 12 फूट लांब जागेत आहेत. या जागेतच तपासणी कक्ष, रुग्णांसाठी आसन व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला. त्यात रुग्ण तपासणीसाठी दवाखाने उघडल्यास गर्दी होईल. अशा परिस्थितीत छोट्या दवाखान्यात वा नर्सिंग होममध्ये सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना...

दरम्यान, डॉक्टरच्या या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तसेच कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आणि ठाणे महापालिका यांनी एक अनोखी युक्ती लढविली आहे. त्यांनी डॉक्टर व रुग्णांसाठी एक ऑनलाईन सेवा उपलब्ध केऊन दिली आहे. यामध्ये रुग्णांना डॉक्टरांशी थेट व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधता येणार असून, तक्रारी मांडून त्याचे निरसन करता येणार आहे. त्यासाठी रुग्णांना https://touhbase.live या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर रुग्णांना डॉक्टरांची यादी दिसणार असून, त्यांच्या वेळा दिसणार आहेत. त्यानंतर रुग्णांना त्यावेळेत डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून आपल्या आरोग्याविषयी तक्रारी मांडून त्याचे निरसन करता येणार आहे. 

यामुळे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टळणार असून, रुग्णांना योग्य सेवा मिळणार आहे. - डॉ. दिनकर देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशन

during corona virus crisis doctors will check patients over video conferencing

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during corona virus crisis doctors will check patients over video conferencing